औरंगाबाद: राहत्याघरी पंख्याला गळफास घेत एका ३७ वर्षीय छायाचित्रकाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री भावसिंगपुरा भागात घडली. आत्महत्येचे करण मात्र अस्पष्ट आहे.ईश्वर भगवान गायकवाड वय-३७ (भीमनगर, भावसिंगपुरा) असे मृत छायाचित्रकाराचे नाव आहे.
रात्री ईश्वर हा त्याच्या खोलीत गेला होता मात्र बराच वेळ झाल्या नंतर देखील तो बाहेर येत नसल्याने नातेवाईकांनी त्याच्या खोलीत डोकावून पाहिले असता त्याने साडीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे दिसले नातेवाईकांनी तातडीने ईश्वराला फासावरून उतरवत घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र तो पर्यन्त त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ईश्वराने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास साह्ययक पोलीस उप निरीक्षक सुरेश जिरे हे करीत आहेत.